Monday, October 29, 2012

शरद पौर्णिमा अर्थात रासपौर्णिमा..!!! कामलीला नव्हे ही तर कामविजयलीला....!!!





 आज शरद पौर्णिमा..! म्हणजेच रास पौर्णिमा..!!! श्रीमद्भागवतानुसार आजच्या रात्रीच पुर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी वृन्दावनामध्ये गोपींसह रासक्रीडा संपन्न केली. भक्तिशास्त्रामध्ये या रात्रीचे फार अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रीमद्भागवता मध्ये दशम स्कंधामध्ये "रासपंच्याध्यायी" नावाने पाच अध्याय आहेत जे भागवताचे पाच प्राण मानले जातात. या पाच अध्यायामध्ये रासक्रीडेची कथा येते. 

रसौ वै स: ! 

भगवान
श्रीकृष्ण आत्मा आहे. आत्माकार वृत्ती रासरासेश्वरी श्रीराधा आहे आणि इतर गोपी या आत्माभिमुख  वृत्ती आहेत. रास शब्दाचा अर्थ आहे मुल रास या शब्दापासून. भगवान श्रीकृष्ण स्वतः रसपूर्ण आहेत. आणि या रासरासेश्वर भगवान श्रीकृष्णाशी अनंत रसांनी एकरूप होऊन जी दिव्य क्रीडा केली जाती तीच रासक्रीडा आहे. भागवत संप्रदायामध्ये या लीलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रासालीलेचा  अर्थ अध्यात्मिकदृष्ट्या समजून घेण्यासारखा आहे.शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णांनी गोपींबरोबर रासलीला केली. "गोपी" शब्दाचा अर्थ "गोभि: रस: पिबति इति गोपी"."गो" म्हणजे इंद्रिये.

रासलीलेमध्ये  भगवंतांनी आपल्या अधरांनी बासरीचे स्वर छेडले आणि त्या मधुर निनादाने गोपी धावत श्रीकृष्णाला भेटायला आल्या. श्रीकृष्णाच्या बासरी वादनाने सर्व अचेतन वस्तुही सचेतन झाल्या. कुणी भोजन करत होत्या, कुणी आपल्या नवरयाला जेवू घालत होत्या, कुणी बाळाला दुध पाजत होत्या, कुणी शृंगार करत होत्या, कुणी थोरांची सेवा करत होत्या तर कुणी इतर काही कामे करत होत्या. बासरीचा हृदय हेलावणारा स्वर ऐकताच त्या सर्व घाईने हातातले काम तसेच टाकून भगवंताला भेटायला निघाल्या. भेटताच भगवंतांनी येण्याचे कारण विचारले आणि रात्रीची वेळ सांगून परत जायला सांगितले. पातिव्रत्य धर्माचे पालन करण्याचा उपदेश देऊन त्यांना परत जायला सांगितले. रात्रीच्या वेळी परपुरुषा ला भेटायला येणे हे निन्दनीय आहे असे सांगून त्यांना जायला सांगितले. गोपींची परीक्षा पाहण्यासाठीच श्रीकृष्णांनी त्यांना परत जायला सांगितले.

ज्यांनी आपली मने पूर्णतः गोविंदाच्या चरणारविन्दावर समर्पित केली होती, त्या गोपी सर्वस्वाचा त्याग करून रासक्रीडेसाठी  आल्या होत्या आणि श्रीकृष्णाचे असे स्वर ऐकून त्या निराश झाल्या. पण ईश्वरप्राप्तीच्या उद्धेश्याने आलेल्या गोपी मात्र तिथेच राहिल्या. गोपींनी जे उत्तर दिले ते अतिशय समर्पक आहे. त्या म्हणाल्या कि "तुम्ही परपुरुष  नसून  परमपुरुष आहात. सर्व वेदांचा आणि धर्माचा आणि  व्रतांचा सार काय आहे तर ईश्वर प्राप्ती !!! त्यामुळे तुम्ही आमचा त्याग करूच शकत नाही." गोपींच्या अंतःकरणातली ही परम शुद्ध आणि सर्वश्रेष्ठ अशी भक्ती पाहून श्रीकृष्णाचे हृदय दयेने भरून आले आणि त्यांनी रासक्रीडेला अनुमती दिली आणि रासलीलेला सुरुवात झाली.

खरे तर भगवंतांची वंशीध्वनी ऐकून फक्त  गोपींनाच यायची  इच्छा  झाली आणि उदारशिरोमणी भगवान  श्रीकृष्णांनी जेंव्हा  गोपींचा  अशा  प्रकारे सम्मान केला   तेंव्हा गोपींना असा भाव निर्माण  झाला कि  समस्त पृथ्वीवर केवळ आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत  कि ज्यांनाच  केवळ  श्रीकृष्णाशी  अशा  प्रकारे  क्रीडा  करण्यास संधी मिळाली. गोपींच्या मनात निर्माण झालेला हा दर्प म्हणजे अहंकार पाहताच सर्वज्ञ असे भगवान  श्रीकृष्ण तिथून अंतर्धान पावले. जिथे मन परमेश्वराला सोडून देह धारणेत संलग्न होते तिथून परमेश्वर अंतर्धान पावतो हे निश्चित. आता भगवान श्रीकृष्णांनी अंतर्धान होण्याचे कारण हे आहे की विरह हाच संयोगाचा पोषक आहे. कारण विरहामध्येच प्रिय व्यक्तीचे चिंतन तीव्रतेने होते. ज्याच्या हृदयामध्ये शेषमात्र अहंकार आहे, तो भगवंतांच्या समोर उभा राहण्यास पात्रच नाही.  अचानक श्रीकृष्ण अंतर्धान पावल्याचे पाहून गोपींची मने विरःवेदानेने व्यथित झाली आणि या विरहातूनच गोपिगीत या भक्तीरसाने परिपूर्ण अशा गीताचा उदय झाला.

गोपीगीत

श्रीमद्भागवतामध्ये जी काही गीते आहेत त्यामध्ये गोपीगीत हे सर्वश्रेष्ठ आहे. विरहवेदनेने व्याकूळ झालेल्या, अगदी अर्धमेल्या झालेल्या गोपींच्या तोंडून पडलेले हे गोपीगीत म्हणजे भक्तीची पराकाष्ठा आहे.
गोपी या श्रीकृष्णाला शोधता शोधता इतक्या श्रीकृष्णमय झाल्या  कि त्या स्वतःलाच श्रीकृष्ण समजून क्रीडा करू लागल्या. यमुनेच्या तीरावर येऊन सगळ्या गोपींनी एकमुखाने गोपीगीत गायले. कारण सगळ्यांची मने पूर्णतः  श्रीकृष्णमय झालेली असल्याने त्यांच्या तोंडून सर्वामुखाने एकाच गीत बाहेर पडेल यात शंका ती कोणती??? या गोपिगीतामध्ये २९ श्लोक असून हे गोपीगीत "कनक मंजिरी" छंदामध्ये आहे.  गाण्यास अतिशय गेय आणि भक्तीरसाने ओतप्रोत असे आहे. हे गोपीगीत श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे अनुकरण करून भगवंताशी एकरूपता साधण्याची अलौकिक अशी जी काही भक्ती गोपींनी दाखवली आहे त्याला इतिहासामध्ये तोड नाही.

रासक्रीडा आक्षेप आणि खंडण


रात्रीच्या वेळी परस्त्रीयांबरोबर भगवान श्रीकृष्णाने अशी ही आक्षेपार्ह क्रीडा कशी केली असा संशय बऱ्याच जणांच्या मनात येतो. पण आधी हे सांगणे आवश्यक आहे की ही रासक्रीडा ही सामान्य कामक्रीडा नसून त्याला एक अध्यात्मिक अर्थ आहे. भगवान श्रीकृष्णाचा देह हा साधारण मानवासारखा सामान्य देह नसून तो सच्चिदानंद असा परिपूर्ण आहे.


ईश्वर: परम: कृष्ण: सच्चिदानंद विग्रह: !
अनादिरादिर्गोविंद: सर्वकारणकारणम !! १ !!

आपली मानवी इंद्रिये ही मर्यादित आहेत.म्हणजे हाताचे काम फक्त हातच करून शकतात. डोळ्याचे काम पाहण्याचे, जे डोळेच करू शकतात. इथे मानवी इंद्रियांची मर्यादा लक्षात येते. पण भगवान श्रीकृष्ण यांच्या बाबतीत असे नाही. त्यांची कोणतीही इंद्रिये कोणतीही कार्ये करू शकतात. म्हणजे डोळे हाताचे कार्य करू शकतात आणि हात डोळ्याचे पाहण्याचे कार्य करू शकतात. याची पुष्टी खालीलप्रमाणे आहे.

अंगानि यस्य सकलेंद्रिय वृत्ती मन्ति!
पश्यन्ति पंती कलयन्ति चिरं जगन्ति !
आनंद चिन्मय सद उज्ज्वल विग्रहस्य !
गोविन्दम आदिपुरुषम तम अहं भजामि !! ३८ !! ( ब्रम्ह्संहिता )


रासक्रीडा -  कामलीला नव्हे ही तर कामविजयलीला
 
रासलीलेचा अध्यात्मिक अर्थ असा आहे की वृंदावन म्हणजे आपले अंतःकरण. श्रीकृष्ण म्हणजे आपला आत्मा. श्रीकृष्णाच्या बासरीचा स्वर म्हणजे आपल्या अंतःकरणात निघणारा अनाहत ध्वनी जो योगी लोकांना ऐकू येतो. या ध्वनीने निर्माण होणारया अंतःकरणातील भावना आणि तरंग म्हणजे गोपी. आणि या तरंगांच्या आत्म्याशी होणारया मिलनाचे साधर्म्य रासलीलेशी  आहे. कारण जीवन एक महारास आहे आणि भगवान श्रीकृष्णाशी होणारी ही रासक्रीडा हिच मनुष्य जीवनाची अंतिम पराकाष्ठा आहे, परम ध्येय आहे. भागवतामध्ये शुकाचार्यांनी श्रीकृष्णाला साक्षात्मन्मथमन्मथ :  असे म्हटले आहे.  ही कामक्रीडा नसून कामविजयलीला आहे. अंतःकरणातला कंदर्प म्हणजे जो काम तो नष्ट करण्याचे सामर्थ्य या कथेमध्ये असून ही कथा भक्तीरस वाढवणारी असून ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर करणारी आहे. गोपीगीत हे नित्य पठण करायचे असून त्याने अवश्य भक्ती वाढविता येते. तेंव्हा भातीरासाचे परमरहस्य  अशा या रासक्रीडेचे पठण करून आपणही भगवान श्रीकृष्णाच्या कृपेचे पात्र बनुयात.


शरद  पौर्णिमेच्या  आपणा सर्वांस  हार्दिक शुभेच्छा !
गोपालकृष्ण भगवान की जय !
राधारमण वृंदावन बिहारीलाल की जय..!
पूर्ण पुरुषोत्तम पूर्णावतार श्रीकृष्ण चंद्र भगवान की जय !
जय श्रीराधे...!!!  जय श्रीकृष्ण..!!!
 

।।गोपी गीत।।

जयति तेडधिकं जन्मना व्रजः
श्रयति इन्दिरा शश्वदत्र हि।
दयति दृश्यतां इक्षु तावका
स्तवयि धृतासवस्त्वां विचिन्वते।।1।।

शरदुदाशये साधुजातसत्
सरसिजेदरश्रीमुषा दृशा।
सुरतनाथ तेडशुल्कदासिका
वरद निध्नतो नेह किं वधः।।2।।

विषजलाप्ययाद् व्यालराक्षसाद्
वषॅमारूताद् वैधुतानलात्।
वृषमयात्मजद् विश्वतोभया-
दृषभ ते वयं रक्षिता मुहुः।।3।।

न खलु गोपिकानन्दनो भवा-
नखिलदेहिनामन्तरात्मदृक्।
विखनसाडथितो विश्वगुप्तये
सख उदेयिवान् सात्वतां कुले।।4।।

विरचिताभयं वृष्णिधुयॅ ते
चरणमीयुषां संसृतेभॅयात्।
करसरोरूहं कान्त कामदं
शिरसि धेहि नः श्रीकरग्रहम्।।5।।

व्रजजनातिॅहन् वीर योषितां
निजजनस्मयध्वंसनस्मित
भज सखे भवत्किङरीः स्म नो
जलरूहाननं चारू दशॅय ।।6।।

प्रणतदेहिनां पापकशॅनं
तृणुचरानुगं श्रीनिकेतनम्।
फणिफणापॅितं ते पदाम्बुज
कृणु कुचेषु नः कृन्धि हृच्छयम्।।7।।

मधुरयागिरा वल्कुवाक्यया
बुधमनोतज्ञया पुष्करेक्षणं।
विधिकरीरिमा वीरमुह्यती-
रधरसीधुनाडडप्याययस्व नः।।8।।

तव कथामृतं तप्तजीवनं
कविभिरीडितं कल्मषापहम्।
श्रवणमंङगलं श्रीमदाततं
भुवि गृणन्ति ते भूरिदा जनाः।।9।।

प्रहसितं प्रिय प्रेमवीतक्षणं
विहरणं च ते ध्यानमङ्ग्लम्
रहसि संविदो या हृदिस्पृशः
कुहक नो मनः क्षोभयन्ति हि।।10।।

चलसि यद् व्रजच्चारयन् पशून्
नलिनसुन्दरं नाथ ते पदम्।
शिलतृणाङकुरैः सीदतीति नः
कलिलतां मनः कान्त गच्छति।।11।।

दिनपरिक्षये नीलकुन्तलै-
वॅनरूहाननं बिभ्रदावृतम्।
धनरजस्वलं दशॅयन् मुहुः
मॅनसि नः स्मरं वीर यच्छसि।।12।।

प्रणतकामदं पद्मजचितं
धरणिमण्डनं ध्येयमापदि।
चरणपङक्जं शन्तमं च ते
रमण नः स्तनेष्नपॅयाधिहन्।।13।।

सुरतवधॅनं शोकनाशनं
स्वरतवेणुना सुष्ठु चुम्बितम्।
इतररागविस्मारणं नृणां
वितर वीर नस्तेडधरामृतम्।।14।।

अटति यद् भवानह्नि काननं
त्रुटियुगायते त्वामपश्यताम्।
कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते
जड उदीक्षतां पक्ष्मकृद् दृशैम्।।15।।

पतिसुतान्वयभ्रातृबान्दवा-
नतिविलङध्य तेडन्त्यच्युतागताः।
गतिविदस्तवोद् गीतमोहिताः
कितव योषितः कस्त्यजेन्निशि।।16।।

रहसि संविदं हृच्छयोदयं
प्रहसिताननं प्रेमवीक्षणम्।।
बृहदुरः श्रियो वीक्ष्य धाम ते
मुहुरतिस्पृहा मुह्यते मनः।।17।।

व्रजवनौकसां व्यकितरङग ते
वृजिनहन्त्रयलं विश्वमङग्लम्।
त्यज मनाक् च नस्तवत्स्पृहात्मनां
स्वजनहृदरूजं यन्निषूदनम्।।18।।

यत्ते सुजातचरणाम्बुरूहं स्तनेषु
भीताः शनैः प्रिय दधीमहि ककॅशेषु।
तेनाटवीमटसि तद् व्यथते न किंस्वित्
कूपाँदिभिभ्रमति धीभॅवदायुषां नः।।19।।

इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूवाँधेँ रासक्रीडायां ||

गोपीगीतं नामैकत्रिंशोडध्यायः।।